या बस स्थानकात भाजीपाला व्यापाऱ्याला दहा हजारांचा फटका
वेगवान मराठी : [दि . 29 ऑगस्ट 2025 ]
नांदगाव : नांदगाव बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्याने भाजीपाला व्यापारी मुनोवर मन्सुरी यांना दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
मुनोवर मन्सुरी हे त्यांच्या पत्नीसमवेत नाशिकला जाण्यासाठी बस स्थानकात आले होते. नाशिकची गाडी पकडत असताना त्यांच्या खिशातील दहा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. घटनेनंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले, मात्र तोपर्यंत चोर पसार झाला होता.
सदर चोरीच्या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा घटनांवर आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, नांदगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे .



