नाशिक ग्रामीण

या गावी विज पडून एक महिला ठार चारजन गंभीर जखमी !

Nandgaon news

वेगवान मराठी :

नांदगांव [ दि 28 ऑगस्ट 2025 ]

नांदगाव तालुक्यात दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळपासून आकाशात ढगांचा गडगडाट प्रचंड प्रमाणात होत होता याच दरम्यान पाऊस देखील चालू होता .

या दरम्यान वीज कोसळून एक महिला ठार झाली असून चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत .ही घटना नांदगाव तालुक्यातील मूळ डोंगरी शिवारातील पांढरवड या भागात  मजुर शेती कांम करीत असताना घटना घडली .

नांदगाव तालुक्यातील मूळ डोंगरी शिवारातील पांढरवाड वस्तीवर दुपारी वीज कोसळण्याची घटना घडली. या घटनेत सुमनबाई बाळू वाघ  यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच बाळू मुकणे, रवी हीलम, साहेबराव हीलम आणि सुनील चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर जखमी हे 30 ते 45 वयोगटातील आहेत .

जखमींना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉ. काजल तुसे यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.सदर मयत व गंभीर जखमींना शासन स्तरावर मजुरांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे .

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!