नाशिक ग्रामीण

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण पूर्ण क्षमतेने भरले?

Nandgaon news

वेगवान मराठी : मारूती जगधने

नांदगाव [दि 28 ऑगस्ट 2025 ]

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पानीसाठा असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण आज मीतिला 88 टक्के भरल्या चे खात्रीशीर वृत आहे . सध्या सुरू असलेला पाऊस खरिपातील पोळ आणि लाल रांगडा कांद्याला उपयुक्त ठरणारा भिज पाऊस शेतातील विहिरींना पावसाचे पाणी उतरून त्याचा उपयोग रब्बी हंगामासाठी होऊ शकतो एकंदरीत हा पाऊस शेतीस उपयुक्त ठरणार आहे .

दरम्यान नांदगाव तालुक्यातील सुरू असलेल्या पावसाने ढगांचा प्रचंड प्रमाणात गडगडात आणि विजांचा कडकडाट होत आहे .दोन दिवसापूर्वी नांदगाव मल्हारवाडी येथे वीज पडून तीन शेळ्या मेंढ्या दगावल्याची घटना घडली आहे . आणि 28 ऑगस्ट रोजी देखील प्रचंड ढगांचा आवाज कानी पडत होता .

नांदगाव तालुक्यात पुन्हा पावसाला सुरुवात – झाली आहे यापूर्वी धरणे ओसंडून वाहत आहेत आता गिरणा धरण देखील 88% भरले .

नांदगाव : तालुक्यात गेल्या सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे. या पावसामुळे नद्या-नाले पुन्हा एकदा खळखळू लागले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाणी असले तरी नांदगाव शहर आणि ग्रामीण भागामध्ये पिण्याची पाण्याची समस्या गंभीर आहे केवळ पाणी नियोजनाचा अभाव असल्यामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे .

.नांदगाव शहरासह 56 खेडी योजना सध्या पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे .नव्याने 78 खेडी योजना उभी राहत आहे गेल्या दोन वर्षापासून या योजनेचे काम चालू आहे मात्र अजून या योजनेतून नळाचे पाणी नागरिकांना मिळालेला नाही या प्रतीक्षेत नागरिक आहे .

.दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी पाणी पाहणी  करून नागरिकांना परिस्थितीची जाणीव करून दिली आहे .

तालुक्यातील गिरणा धरण, नाग्या-साक्या धरण, माणिकपुंज धरण तसेच शाकंभरी नदीवरील लहान मोठी धरणे आधीच भरून वाहत आहेत. गिरणा धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे पिकांना मोठा फायदा झाला आहे. विशेषतः सोयाबीन, कपाशी, मका, कांदा, कपाशी, बाजरी, चारापिके, ज्वारीसाठी हा पाऊस हितावह ठरत आहे. मात्र, धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावर अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले आहे.

नांदगाव शहर व परिसरात दुपारपासून रिमझिम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महसूल, पोलीस विभाग व पाटबंधारे विभागाने केले आहे.

दरम्यान गिरणा धरणातील
२०२४ मधील पाणीसाठ्याचे अहवाल:

(२८ ऑगस्ट २०२४):

गिरणा धरणाचा पाणीसाठा ९२% पर्यंत पोहोचला .

मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव या गावांमध्ये पाण्याच्या तंगीचा प्रश्न लवकरात लवकर मिटेल, असे धरणासंबंधी वृत्तात म्हटले आहे.
(२७ ऑगस्ट २०२४):
सकाळी सुमारे ६ वाजता धरणातील पाणीसाठा ८७.४५% होता.
सध्या
धरणातील जलस्तर वाढले असून, पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलेला आहे.

या धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांमध्ये, विशेषतः मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव आणि ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निवारला जाईल, असे सांगितले गेले आहे.

२०२५ साठी सद्यस्थितीत काही निश्चित वृत्त किंवा अधिकृत डेटा उपलब्ध नाही. पणगिरणा धरण 88 टक्के भरले ची वृत्त आहे ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!