नांदगाव तालुक्यात अवैध दारू व जुगार व्यवसायाचा सुळसुळाट : गणेशोत्सव काळात कठोर कारवाईची मागणी
नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहर, बोलठाण, जातेगाव, साकोरा, मांडवड, भालूर, लोशिंगवे, मनमाड परिसर, कोंढार, वाखरी, पिंपराळे चौफुली व बेळगाव चौफुली दरेगाव निमोण अशा अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री, गावठी दारूच्या भट्ट्या, मटका-जुगार तसेच गुटखा विक्री यासारख्या अवैध व्यवसायांना उघडपणे चालना मिळत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक दारू व्यवसायिक परवाना शर्तीचा भंग करून विनापरवानाधारकाला दारू विकतात आदी बाबी या ठिकाणी चर्चेत आहे यावर देखील आळा घातला पाहिजे बंधन घातली गेली पाहिजे .मध्यप्रदेशांकडून चार चाकी दुचाकी वाहन चालवण्याचे प्रमाण देखील वाढलेला आहे आणि त्यामुळे अपघात देखील घडत आहेत यावर देखील बंधन आली पाहिजेत .
या अवैध धंद्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून, तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी गेली आहे. सामाजिक आणि आरोग्यविषयक दृष्टीने हा धोक्याचा इशारा मानला जात असून, लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, गणेशोत्सवाचा काळ अगदी दारावर येऊन ठेपला असताना तरी या अवैध व्यवसायांवर कठोर आळा बसवावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात अशा गैरप्रकारांना थारा देणे समाजहितासाठी घातक असल्याचे नागरिकांचे मत आहे.साकोरे गावामध्ये सुमारे सात ते आठ गावठी दारूच्या भट्ट्या आहेत दहा ते बारा ठिकाणी अवैद्य दारू विक्री होते जवळपास ग्रामीण भागामध्ये लहान मोठे हॉटेल व्यवसाय या ठिकाणी अवैद्य दारू बिनधास्तपणे विक्री होत असते त्यामुळे तरुण तो व्यसनाच्या आहारी गेलाच आहे परंतु लाडक्या बहिणीचे पैसे देखील आता कुटुंबातील प्रमुख जबरदस्तीने हिसकावून घेऊन जातो आणि ते व्यसनाच्या आहारी घालतो असे अनेक प्रकार गावोगावी नांदगाव तालुक्यातील जवळपास अनेक गावांमध्ये हे प्रकार बिंदासपणे चालत आहे या घटनांना स्थानिक पुढारी देखील काही जबाबदार मानले जातात आणि बहुतांशी अवैध व्यावसायिक लोकप्रतिनिधींचा सहारा घेऊन या व्यवसायाला चालना देतात अशा तक्रारी लहान मोठ्या प्रमाणात मौखिक पद्धतीने होत आहे .रात्रीच्या वेळेला ठीक ठिकाणी असलेली बस थांबे या ठिकाणी तळीराम आणि मानलेले आहे त्याच्या आडोशाला दारू विक्री होते मराठी शाळा हायस्कूल यांच्या आडोशाला सायंकाळच्या वेळेला दारूची विक्री होत असते. गावातील प्रत्येक चौफुली वरती अवैध व्यवसाय हा चालूच आहे पण त्यामुळे गावातील परिसरातील रस्ते आणि मुख्य रस्त्यांवर देखील ठिकाणी दारूच्या बाटल्या बिसलरीच्या बाटल्या फेकलेल्या अवस्थेत असतात याच प्रमाणे लहान मोठे धरण बंधारे नदीकिनारी नदी नाल्यांच्या किनारी देखील अवैद्यव्यवसाय चालतात आणि ठिकठिकाणी देशी-विदेशी दारूच्या बाटल्या बिसलरीच्या रिकाम्या पाण्याच्या वाटल्या फेकलेल्या असतात त्यामुळे अवैध व्यवसायात असल्याचे दिसून येतेस शिवाय घाण कचरा देखील ठिकठिकाणी फेकलेला दिसतो अनेक ठिकाणी लोक दारूच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घालून रस्त्याची देणारी फेकून देतात त्यामुळे दुर्गंधी देखील पसरते .
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाने समन्वय साधून गुप्त माहितीच्या आधारे छापे घालून, गावोगावी सुरू असलेली दारू व जुगाराची अड्डेबंदी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात सामाजिक संघटना, महिला मंडळे व ग्रामस्थ यांनी मिळून प्रशासनावर दबाव आणण्याचे ठरवले असून, गणेशोत्सव काळात तरी कठोर कारवाई व्हावी, अशी सर्वत्र अपेक्षा आहे.



