Uncategorizedनाशिक ग्रामीण

आमदारांचे श्रीशनि देवाला साकडे

Nandgaon News

नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे नस्तनपूर येथे श्री शनिदेव दर्शन

वेगवान मराठी : मारूती जगधने

नांदगाव ( दि 23 ऑगस्ट 2025 ]

.– नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक श्री शनि देव मंदिरात नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी सपत्नीक भेट देऊन दर्शन घेतले.

या प्रसंगी त्यांनी देवाचे आशिर्वाद घेतले व ग्रामस्थांशी संवाद साधला. मंदिर परिसरात झालेल्या धार्मिक वातावरणात आमदार कांदे यांनी नस्तनपूरसह तालुक्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

ग्रामस्थांनी आमदारांचे स्वागत फुलहार व शाल-श्रीफळ देऊन केले. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी नस्तनपूर गावातील विविध विकास कामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. आमदार कांदे यांनी ग्रामविकासासाठी आवश्यक त्या मागण्या शासन दरबारी पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार सुहास कांदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. श्रद्धाळू भाविकांच्या उपस्थितीत दर्शनाचा सोहळा पार पडला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!