नाशिक ग्रामीण

नगरपालिका मतदार प्रारूप प्रभाग रचना ।

Nandgaon News

नांदगाव नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 : प्रारूप प्रभाग रचना जाहीर

वेगवान मराठी : मारूती जगधने

नांदगाव । दि.20 ऑगस्ट 2025

नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक-2025 अनुषंगाने प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार नागरिकांना 31 ऑगस्ट 2025 पर्यंत हरकती व सूचना नोंदविण्यास मुदत देण्यात आली आहे.

नगरपरिषदचे मुख्याधिकारी व प्रशासक शामकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.

इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याने नागरिकांनी आपल्या सूचनांचा व हरकतींचा वेळेत व नियमानुसार पाठपुरावा करावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!