वेगवान नाशिक / अरुण थोरे
निफाड पूर्व भागात बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोरे बु येथील प्रकाश सानप यांच्या वस्तीवर रात्री बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
सदर बिबट्याचा वावर पाचोरे खु., पाचोरे बु., मरळगोई, शिवापूर, गोंदेगाव आदी गावांमध्ये असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सध्या मका पिक असल्याने शेतात राहणाऱ्या नागरिकांमध्ये अधिकच घबराटीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांवर हल्ला होण्यापूर्वी वनविभागाने तत्परतेने पिंजरे लावावेत, अशी मागणी होत आहे.
वेगवान प्रतिनिधी अरुण थोरे यांनी वनविभागाशी संपर्क साधला असता निफाडचे वनाधिकारी विजय दोंदे यांनी मरळगोई खु. व मरळगोई बु. येथे पिंजरे लावले आहेत. पाचोरे परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले तर तेथेही पिंजरा लावण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.