दमदार पाऊस . लाल कांदा लागवडीस प्रारंभ
वेगवान मराठीः दि १६ ऑगस्ट
: – मारुती जगधने
नांदगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाची नोंद होत असताना, विशेषतः 14 व 15 ऑगस्ट रोजी झालेल्या मुक्कामी पावसामुळे शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसासोबतच मागील काही दिवसांत झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे शाकंभरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.झालेल्या पावसाने शेतकऱ्याचा पोळ लाल कांद्याकडे लागवडीसाठी तयार झाला आहे .
सतत कोरड्या पट्ट्यात मोडणाऱ्या या भागात दमदार पावसामुळे नदीला पूराचे स्वरूप आले असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. नदी दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नदीच्या काठावरील गावांमध्ये नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान नांदगाव तालुक्याची जीवन वाहिनी समजली जाणारी शाकंभरी नदी लोशिंगवे, भालुर,लक्ष्मीवाडी सह शाकंभरी नदीवरील केटी वेअर बंधारे तसेच साकोरा येथील बंधारा आदीसह सर्व बंधारे भरून शाकंभरी नदी वाहत आहे यामुळे खरिपा सोबत आता रब्बी पिकांच्या देखील अशा पल्लवी झाल्या आहे .
गेल्या दोन दिवसात पाऊस दमदार झाल्याने शेतकरी आता कांदा लागवडीकडे तयारी करत आहे काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड तर केलीच आहे परंतु अधिक प्रमाणात पोळ कांदा लागवड आता सुरू होण्याची शक्यता लगभग शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेली आहे दोन चार दिवसानंतर या लागवडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे .
अनेकांनी पोळ कांद्याची पोळा सनापूर्वीच लागवड केलेली आहे . तर काही शेतकरी पोळा सणानंतर पोळ कांदा लागवड करतात एकंदरीत पोळ आणि रांगडा कांदा लागवड सोबतच होत असते हे शेतकऱ्यांचे एक नगदी पीक आहे . यावर्षी मका पिकाला दमदार पाऊस मिळाल्याने खरिपाच्या पिकांना चांगल्यापैकी जीवदान मिळालेले आहे उत्पन्न देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते .नदी नाल्यांना पूर आल्याने शेतातील खोदलेले विहीना देखील आता पाणी उतरले सर्वच बाजूने चांगल्यापैकी पाण्याचा आवक सुरू झाल्याने कांदा लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे .



