वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि. १५ ऑगस्ट २०२५ :
“मागेल त्याला घरकुल” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला तब्बल २० लाख घरकुलांचे लक्ष्य देण्यात आले. त्यात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यास ६५०० घरकुलांचे मंजुरीपत्र मिळाले होते.
या घरकुलांचे सर्वाधिक टक्केवारीने पूर्णत्वास नेल्याबद्दल नाशिक जिल्ह्यात निफाड पंचायत समिती अव्वल ठरली. गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहायक गटविकास अधिकारी पाटील, विस्तार अधिकारी पवार, प्रशांत बोरसे, राजेश थोरात, तसेच ऑपरेटर चेतन शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. या कामगिरीबद्दल स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने नाशिक आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते पंचायत समितीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.
निफाड तालुक्याला मिळालेल्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पवार, प्रकल्प संचालक संगमनेरे मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ यांनी अभिनंदन केले.
◆ हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून या यशाचे श्रेय तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, आर.एच.ई, ग्रामरोजगार सेवक, पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व लाभार्थी यांचे आहे.
नम्रता जगताप
गटविकास अधिकारी