नाशिक ग्रामीण

वाजगावच्या ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे झालेल्या ग्रामसभेत गावात सुरू असलेली अवैध देशी दारूविक्री तात्काळ बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सरपंच सिंधुबाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली वाजगाव वडाळे ग्रुप ग्रामपंचायतीची १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.

वाजगावत गावठी दारू पूर्णपणे बंद झाली आहे मात्र, गावात सर्रास सुरू असलेल्या अवैध देशी दारूविक्रीवर बंदी घालण्यासाठी उपाययोजना करावी, अशी सूचना सुनील मोतीराम देवरे यांनी मांडली. या सूचनेला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा देत गावात दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर केला. ग्रामसभेनंतर दारूबंदी समितीचे अध्यक्ष संजय देवरे, उपसरपंच सुनील देवरे, ग्रामसेविका नूतन देवरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी पाच अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी आणि दुकानांवर जाऊन दारूविक्री बंद करण्याची सूचना दिली. त्यांनी यापुढे दारू विकल्यास उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडे तक्रार करून कारवाई करण्याचा इशाराही दिला.

ग्रामसभेला उपसरपंच सुनील देवरे, पोलीस पाटील निशा देवरे, ग्रामसेविका नूतन देवरे यांच्यासह तुषार देवरे, प्रदीप सोनवणे, प्रभाकर देवरे, गिरीश आहेर, डॉ. प्रीतम आहेर, आरोग्य सेवक अशोक जाधव, मीनाक्षी वाघ, आशा सेविका प्रमिला मगर, ज्योती आहेर, रंजना देवरे, ज्योती केदारे, एकनाथ खैरणार, समाधान केदारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शुभानंद देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!