सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षकांची रिक्त जागा बदली दिसत नसल्याने कायम स्वरुपी शिक्षकांवर अन्याय ,जागा दाखवावी, कार्याध्यक्ष युवराज पवार

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगांव ता . ८ऑगस्ट २०२५ :- शासनाकडुन सध्या ह्या वर्षी प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे .सेवानिवृत कंत्राटी प्राथमिक शिक्षकांची रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांना रिक्त दिसत नसल्याने कायमस्वरूपी शिक्षकांवर अन्याय होत असून ही रिक्त जागा दाखवावी अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षक संघांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवराज पवार यांनी केली आहे
शासनाने १५ जुलै शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या रिक्त जागेवर सेवानिवृत्त शिक्षकांची वीस हजार मानधनावर कंत्राटी नियुक्ती केली पुन्हा प्रशासनाने २५ – २६ नवीन वर्षात पुन्हा पत्र निर्गर्मित करून सेवानिवृत्त शिक्षकांना आव्हान केले . राज्यभर कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत शिक्षक भरती के ली . बदली प्रक्रियेत हया रिक्त जागा शासनाने दाखविण्याची गरज होती ह्या रिक्त जागा बदली प्रक्रियेत दिसत नसल्याने कायमस्वरूपी सेवेत असलेल्या शिक्षक, शिक्षिकांना तालुका सोडून इतरत्र तालुक्यात जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे नोकरीविना डी. एड . बी . एड . एम .एड .हजारो युवकांना दहा हजारावर नोकरी मिळणे दुरापत झाले आहे .सेवानिवृत्त होऊन शिक्षकांना उपदान विक्री अंश राशीकरण पेन्शन विक्री असे ३ ० ते ४० लाख रुपये मिळतात दर महिन्याला ४ ० ते ५ ५ हजार रुपये पेन्शन मिळते हक्क असला तरी तरुण पिढी भाजून निघत आहे .वैफल्यग्रस्ता मुळे आत्महत्या अशा घटना घडत आहेत. तरी सेवानिवृतांनी शिक्षकांनी २० हजाराचा मोह न ठेवता बेरोजगार तरुणांवरील व बदली पात्र शिक्षकांना वरील अन्याय दुर करन संधी द्यावी व अन्य जणांचे लग्न जुळतील व तालुक्यात नोकरी असल्यास कुटुंबाला आधार होईल .असे आव्हानही शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवराज पवार यांनी केले आहे.
चौकट – शासन सेवानिवृत शिक्षकांना 20 हजारावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करत आहे निवृत्त शिक्षकांनी 20 हजाराचा मोह न ठेवता बेरोजगार तरुणांना संधी द्यावी बदली पात्र शिक्षकांना सेवानिवृत्त शिक्षकांच्या रिक्त जागा बदली प्रक्रियेत दिसत नसल्याने अन्य शिक्षकांना बाहेर तालुक्यात बदली करुन जाण्याची वेळ आली आहे ह्या शिक्षकांवर अन्याय होत आहे
-युवराज पवार – राष्ट्रीय कार्याधक्ष -शिक्षक संघ , माजी उपसभापती – बाजार समिती नामपुर



