नाशिक ग्रामीण
देवळा तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : होऊ घातलेल्या निवडणुका तसेच याच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली. नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. आ. शिरीष कुमार कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी श्री.ब्रिज किशोरची दत्त, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव विश्वजीत हाप्पे , युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भारतजी टाकेकर, दिगंबर गीते उपस्थितीत होते.
सदर बैठकीत आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत आढावा घेण्यात आला तसेच पक्ष संघटन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सदर बैठकीस प्रांतिक सदस्य दिलीप पाटील, देवळा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष दिनकर निकम, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आर्कि.स्वप्निल सावंत ,प्रवीण सूर्यवंशी, कैलास शिरसाठ, बाळासाहेब खैरनार, रथी पाटील, दिलीप आहेर, संजय पवार त्याचप्रमाणे काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



