नाशिक ग्रामीण

गोदाकाठी चोऱ्यांचे सत्र थांबेना, बंगल्याचे कुलूप तोडले, दागिन्यांसह रोकड लंपास…

शरद शेळके,वेगवान न्यूज नेटवर्क

सिन्नर तालुक्यात काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाडी- वस्त्यांवरील नागरिकांना चोरट्यांच्या भीतीमुळे रात्र रात्र जागून काढावी लागत आहे.

सिन्नरच्या सरहद्दीवर असणाऱ्या जोगलटेंभी येथे दि.५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या वरील बंद रूमचा दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला. आत मध्ये ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप व कोंडा तोडून त्यातील अंदाजे 58 हजार रुपये किमतीचे दागिने व अठरा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी नारायण बारकू सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टेमगर करत आहेत.

सिन्नर तालुका व सीमेवरील गावांमध्ये चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या एकास नागरिकांनी पकडून सिन्नर जात एमआयडीसी पोलिसांच्या हवाली केले होते. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!