अपघातात अपंगत्व आलेल्या युवकास शासकीय योजनांचा लाभ , आमदार दिलीप बोरसे यांचे आश्वासन

वेगवान नाशिक/ तुषार रौंदळ
विरगांव ता . ५ ऑगस्ट २०२५:- किरातवाडी ( ता . बागलाण ) येथील आदिवासी युवक शरद सोनवणे यांचा अपघातात गुडघ्यापासून एक पाय जाऊन अपंगत्व आले आहे . आमदार दिलीप बोरसे यांनी तब्येतीची विचारपूस करत शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याचे आश्वासन दिले
जुनी शेमळी ग्रामपंचायत अंतर्गत ही आदिवासी वस्ती येत असून सोनवणे हा युवक दोन तीन महिन्यापुर्वी लग्नाला मोटरसायकल वर जात असताना अचानक टॅक्टर विरुद्ध रस्त्यावरुन निघाले व मोटरसायकलला धडक दिली त्यात त्याला आपला एक पाय गुडघ्या पासून गमवावा लागला आहे .घरातील कर्तबगार कष्टकरी मुलाचा पाय गेल्याने घरातील कुंटुंब अस्वस्थ झाले आहे चार व सात वर्षाचे दोन लहान मुले आई ,पत्नी कष्ट करुन उदर निर्वाह करतात .कुठे जाणे येणे शक्य नसल्याने घरातच बसुन दिवस कठावे लागत आहेत .
आमदार बोरसे यांनी वस्तीला मंगळवार (दि.५)रोजी भेट दिली असता गांवातील विकास कामांची पाहणी करुन अपंगत्व आलेला युवक शरद सोनवणे ( वय ३ ० ) याची तबेतीची विचारपुस करत धिर दिला व शासकीय योजनाचा लाभ मिळवुन देण्याचे सांगितले . यावेळी उपस्थितांचे अश्रु अनावर झाले होते
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शरद भामरे,उपसरपंच अनिल गायकवाड ,संजय गांगुर्डे , जनार्दन शेलार, साहेबराव बच्छाव , साखर चंद बच्छाव, बाजार समिती चे माजी चेअरमन नरेंद्र आहिरे , रविंद्र थोरात विनोद आहिरे , जिभाऊ व्यापार , रतन निकम , दिलीप निकम आदि ग्रामस्थ महिला उपस्थित होते



