नाशिक ग्रामीण

चोराच्या उलट्या बोंबा, दोन चोरटे पसार… एकास पकडून बदडले, पण तो….

ग्रामस्थांनी चोरट्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

शरद शेळके, वेगवान न्यूज नेटवर्क

सिन्नर ‘कानून के हात बहोत लंबे होते है’ पोलिसांच्या नरजेत कोणताही चोरटा किंवा अपराधी सुटत नाही. परंतु आजकालच्या चोरट्यांचे नेटवर्क एवढ मजबूत आहे की चोरटे महिनाभरापासून पोलिसांच्या हाती लागत नाही.सिन्नर व निफाड तालुक्यात  काही आठवड्यांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून, गावोगाव चोरट्यांनी नागरिकांना बेदम मारहाण करत काही ठिकाणी दरोडे टाकले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी म्हाळसाकोरे, भुसे शिवारात चोरीच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर  एकही घटना घडली नाही. अनेक गावांमध्ये चोरांच्या वेगवेगळ्या अफवाच  असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. ‘लांडगा आला रे आला’ याप्रमाणे वाडी-वस्तीवरील लोकांना रात्र जागून काढावी लागत आहे.परिसरातील तरुण आता पोलिसांच्या भरवशावर न राहता स्वतः टोळक्याने गावाला पहारा देत आहेत. या घटनांमधील चोरट्यांचा सुगावा पोलिसांना लागत नसल्याने नागरिक भयभीत होते.

आता सर्वसामान्य नागरिकांनी देखील ‘आपली सुरक्षा आपली हाती’ प्रमाणे चोरट्यांना पकडून देण्याचे काम केले आहे.  नायगाव परिसरात काही दिवसांपासून ‘आले-आले, पळाले-पळाले’ म्हणत नागरिक रात्रभर गस्त घालत होते. परंतु चोरटे नागरिक आणि पोलिसांच्याही हाती लागत नव्हते. अशातच दि .4 ऑगस्ट पहाटे चारच्या सुमारास नायगाव येथे ग्रामपंचायत सदस्य बंडू चव्हाण यांच्या मळ्यात  तिघे इसम रात्रीच्या वेळी दोन ते तीन घरांच्या कड्या खोलण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. तात्काळ नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला व चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या तीन जणांच्या टोळीतील एकास ग्रामस्थांनी पाठलाग करीत पकडले त्यांच्या  हातात धारदार शस्त्र देखील असल्याचे नागरिक सांगत आहेत. ग्रामस्थांनी  चोरट्याला चोप देवून एमआयडीसी सिन्नर पोलिसांच्या स्वाधीन केले.

एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयताची चौकशी केली. संजय राऊत (रा. हरसुल ) असे त्याचे नाव असून तो वडझिरे येथील एका शेतकऱ्याकडे कामासाठी आलेला होता. परंतु दारूच्या नशेत तो नायगाव परिसरात  गेला असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. संशयीतास विश्वासात घेऊन सोबत असणाऱ्या  दोघांची चौकशी केली असता ते दोघेच त्याच्या पाठीमागे लागले होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली असल्याचे समजते. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

ठिकठिकाणी चोरीच्या घटना घडल्या नसल्या तरी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचे डाव असफल होत आहे.हे चोर नाही तर नेमके कोण आहेत? याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी. पहाटेच्या वेळेस कोणती दारूचे दुकाने उघडे असतात. वाड्या वस्त्यांवर दारू मिळते का? पकडलेल्या चोरट्यांकडे कुऱ्हाड यासारखे धारदार शस्त्रही होते असा सवाल संतप्त ग्रामस्थ करत आहेत.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!