मनोज जरांगेपाटील यांचा निफाड तालुक्यात या गावी होणार महाएल्गार मेळावा

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१ ऑगस्ट २०२५ :- मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत येत्या दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता खेडलेझुंगे (ता. निफाड) येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट रोजी खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा स्मारक मंदिरात समाजबांधवांची नियोजन बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीस निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यांतील शेकडो मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून समाजाच्या एकजुटीचा निर्धार केला. बैठकीत महामेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा, आरोग्य व सुरक्षा व्यवस्था यांचे काटेकोर नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामेळाव्यास ५० हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तालुकास्तरावर जनजागृती मोहीम राबवून अधिकाधिक बांधवांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.
बैठकीत प्रवीण कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रसाद फापाळे, अभिजित डुकरे, राजेश भडांगे, राहुल वाघ, धर्मराज घोटेकर, विजय गिते, गणेश गोरडे, अजय सदाफळ, अजिंक्य साबळे, अमोल मेमाणे, कल्पेश वायकर, भैय्या घोटेकर, अनिकेत साबळे, सागर भारस्कर, नारायण सदाफळ, ऋषी घोटेकर, अनिल सदाफळ, बाबा गोसावी, प्रदीप परदेशी, निलेश घोटेकर, सागर सदाफळ, शरद गिते, सुनील माळी, विठ्ठल बेर्डे, विष्णू मेमाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी संयोजनात सक्रिय सहभाग घेतला.



