सिन्नर येथील तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या…
सिन्नर येथील तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर: दि, 1 ऑगस्ट 2025 —
,,,, सिन्नर येथील तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या… !
सिन्नर शहरालगत असलेल्या उद्योग भवन शेजारील रोहाऊस मध्ये भाडे तत्वावर राहत असलेल्या 23 वर्षाच्या तरुणीने घरात छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की.सिन्नर च्या अशोका शाळेजवळ व उद्योग भवन शेजारील प्रदिप घोडेराव यांच्या रो हाऊस न.04 या सोसायटीत भाड्याने घेऊन रहात असलेल्या घरात स्नेहल सतिष गायगोले. (वय 23 वर्षे ) या तरुणाने गुरुवार दुपारी चार वाजेच्या दरम्यान पंख्याला दोरी बांधून स्व:ताला गळ्यात दोरी अडकून घेऊन गळफास लावून घेतला.
त्यात तीचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पोलीसांच्या मिळताच सिन्नर पोलिसांनी दखल घेऊन अकास्मित मृत्यू रजि.नं.90 / 2025 BNSS – 194 प्रमाणे दि. 31 /7/2025 रोजी 16 / 38 स्टे.डा.नं . 21/2025 नोंद करण्यात आली आहे… घटनेचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तर सिन्नर पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सह तपास हवालदार चौगुले हे अधिक तपास करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…



