नाशिक ग्रामीण

जिल्हास्तरीय बॉल-बॅडमिंटन स्पर्धेत भावडेच्या व्ही.के.डी. स्कूलचे तिहेरी यश!

१४ व १७ वर्षांखालील तीनही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : नाशिक जिल्हास्तरीय शालेय बॉल-बॅडमिंटन स्पर्धेत भावडे येथील एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या आणि १७ वर्षांखालील मुलांच्या संघांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या दैदिप्यमान यशामुळे शाळेच्या तिन्ही संघांची विभागीय बॉल-बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेत विजयी ठरलेले खेळाडू

तिन्ही संघांतील खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत अचूक नियोजन, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर एकतर्फी मात केली.

  • १७ वर्षांखालील मुलांचा संघ: श्रीकृष्णा पाटील, निल केले, सार्थक देवरे, गौरव कापडणीस, गणेश सूर्यवंशी, निर्मल चव्हाण, आदित्य सावकार, अजिंक्य निकम, वीर झाल्टे आणि शिवम पाटील.
  • १७ वर्षांखालील मुलींचा संघ: खुशाली कापडणीस, ऐश्वर्या बागुल, प्रियंका बच्छाव, अनिशा मोरे, हर्षाली शिर्के, समृद्धी देवरे, तन्वी देवरे, सृष्टी रौंदळ, हर्षदा सावकार आणि श्रद्धा अहिरे.
  • १४ वर्षांखालील मुलींचा संघ: ईश्वरी काकुळते, ईश्वरी भामरे, अक्षरा मोरे, अनुष्का बच्छाव, जान्हवी बच्छाव, रावी पवार, वैभवी वाघ, स्वरांगी भदाणे, प्रांजल ठिंगळे आणि अंकिता अहिरे.

मार्गदर्शक व मान्यवरांकडून कौतुक

या यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख निलेश भालेराव, क्रीडा शिक्षिका चेतना शेवाळे व ऐश्वर्या जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संजय देवरे, सचिव मीना देवरे, मुख्याध्यापक नितीन वाघ तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन केले.

“खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेल्या या यशामुळे व्ही.के.डी. स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हास्तरावरील या घवघवीत यशानंतर आता विभागीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्यासाठी आमचे तिन्ही संघ सज्ज झाले आहेत.” — नितीन वाघ, मुख्याध्यापक  (व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज)

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!