पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी देवळ्यात ‘आशीर्वादाचा दिवा’

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि निरंतर राष्ट्रसेवेसाठी ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमांतर्गत दीपप्रज्वलन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वातून भारताला विकास, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रनिर्माणाची नवी दिशा दिली आहे. ईश्वराने त्यांना शक्ती व सामर्थ्य प्रदान करावे, जेणेकरून विकसित भारताचा संकल्प साकार करण्याचा प्रवास ते अविरतपणे पुढे नेत राहतील, असे प्रतिपादन चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त देवळा येथील आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष किशोर आहेर होते.
पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी तालुकावासीयांना व लाभार्थ्यांना आपल्या घरी सायंकाळी दिवा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुषंगाने आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. राहुल आहेर, तालुकाध्यक्ष किशोर आहेर व शहराध्यक्ष अशोक आहेर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी शेखर आहेर, तुषार शिरसाट, किरण निकम, प्रकाश गरुड, किशोर बोरसे, दगडू भामरे, दशरथ अहिरे, राहुल देवरे, सुनिल जाधव, सचिन गांगुर्डे, शशिकांत ठाकरे, राजेंद्र शिरसाठ, तुषार शिरसाठ, भिला आहेर, किशोर बोरसे, जितू पवार, वैजनाथ देवरे, दत्तात्रेय देवरे, किरण निकम, सागर पगार आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



