नाशिक ग्रामीण

संविधान विरोधी काम करीत असल्यास आम्ही निषेध करतो.

Nandgaon news

वेगवान मराठी :16 Jजुलै 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कलम ३४१ मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, अनुसुचित जातीच्या यादीमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार हा केवळ संसदेस आहे आणि त्यासंबंधी अधिसुचना जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.

न्या. बदर समितीचा उपवर्गीकरण संदर्भात अहवाल सरकारकडे घेतला असून राज्य सरकार (एस. सी. उपवर्गीकरणाचा) घाट घालुन संविधान विरोधी काम करीत असल्यास आम्ही निषेध करतो.

अनुसुचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा संविधानातील समानता, सामाजिक न्याय व बंधुता या तत्वांच्या विरोधासत असून यामुळे अनुसुचित जातींच्या समुहांमध्ये फुट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. उपवर्गीकरणाच्या या धोरणामुळे जाती-जाती मधील दरी व भेद निर्माण होवून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अनुसुचित आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. अनुसुचित जातीचे विद्यामान आरक्षण कोणताही बदल न करता कायम ठेवण्यात यावे आणि संविधानाच्या मुलभूत तत्वांचे संरक्षण करून सामाजिक न्याय अबाधित राखण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विदयार्थी व देश जागृतीरकरीता जंतर मंतर (दिल्ली) येथे सुरु असलेल्या अभिजीत दिपके व मरणासन्न अवस्थेतप्रत जात असलेले रेमन मॅगससे व इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सोनम वांगचुक यांची भारत सरकार साधी दखल देखिल घेण्यास तयार नाही. याचा देखिल ह्या निवेदनामार्फत आम्ही अत्यंत तिव्र निषेध नोंदवितो.

या मागणीचा शासनाने गांर्भीयपुर्वक विचार करुन अनुसुचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्याबाबत आवश्यक कारवाई करावी. आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द न झाल्यास देशात त्याचे तीव्र पडसाद उमटून आक्रमक आंदोलन करण्यात येईल व याची जबाबदारी संपूर्णपणे सरकारीची असेल. याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

उपवर्गीकरण संघर्ष समिती, नांदगाव

नांदगाव येथे महाराष्ट्र सरकारच्या उपवर्गीकरणास विरोध म्हणुन नांदगांव येथील जुने तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र सरकारच्या उपवर्गीकरणाच्या धोरणाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी मंडल अधिकारी संजय दिंडे साहेब, पी.एस.आय गावित साहेब यांना निवेदन सादर करुन शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. या मध्ये सर्व अनु. जाती घटकातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवत तीव्र विरोध केला. या वेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते नागसेनजी चव्हाण, अरुणभाऊ साळवे, देविदास अण्णा मोरे, मा. नगराध्यक्ष राजाभाऊ बनकर, विलास कोतकर, भीमशक्ती जिल्हा नेते मनोज चोपडे, मा. नगरसेवक अनिल आप्पा जाधव, दत्तु जाधव, रविंद्र गरुड बाबुजी, निर्मलाताई केदारे, नगरसेविका विद्या कसबे, जगताप सर, नाना जाधव, अविनाश केदारे, विश्वास आहिरे, होलार समाज प्रतिनिधी सागर जाधव, महेश चौघुले, रवी सोनवणे, रुद्रा सोनवणे, चर्मकार समाजाचे प्रतिनिधी मधु मामा मोरे, गणेश बडोदे, धनगर समाज नेते भिका खटके, धम्मवेदी बनकर, दिनेश दिंडे, आकाश निकम, बौद्धचार्य आनंद पवार यांनी सुत्र संचालन केले व सर्व अनु. जाती चे समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!