नांदगाव येथे हायवा डंपरच्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू; गंगाध री गावावर शोककळा
Nandgaon news
नांदगाव येथे हायवा डंपरच्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू; गंगाध री गावावर शोककळा
वेगवान मराठी : दि12 जुलै 202 6
नांदगाव (प्रतिनिधी): नांदगाव शहरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात एका शेतकरी मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजेंद्र कारभारी दिघे (वय 45, रा. दत्तवाडी, गंगाधर, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र हे गुप्ता लॉन्स परिसरात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे गंगाधर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. राजेंद्र हे शेतमजुरी व दैनंदिन मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व इतर कुटुंबीय असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष अकाली गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.



