नाशिक ग्रामीण

भावडबारी घाटात सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली; देवळा तहसीलदारांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाला तातडीने उपाययोजनांचे निर्देश

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील भावडबारी घाटात काल दि. २२ आणि आज दि. २३ जून रोजी सलग दोन दिवस दरड व दगडधोंडे कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. घाटाचे काम करताना डोंगर थेट सरळ (उभा) तोडण्यात आला असून, तेथे कोणतीही संरक्षण जाळी बसवण्यात आलेली नाही. पहिल्याच पावसाने येथील दरड कोसळून दगडधोंडे थेट रस्त्यावर आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत देवळा तहसीलदार कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने पत्र जारी केले आहे. घाटातील धोकादायक डोंगर रांगांना त्वरित संरक्षण जाळी बसवणे, वाहनचालकांसाठी इशारा फलक लावणे आणि डोंगराचा भुसभुशीत झालेला भाग आधीच उतरवून घेणे अशा उपाययोजना युद्धपातळीवर करण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे. या पत्राची प्रत नाशिक जिल्हाधिकारी, चांदवड उपविभागीय अधिकारी आणि बी.आर. गोयल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!