नाशिक ग्रामीण

दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

Nandgaon News

वे गं वा न : Maraमराठी 7 June 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर उत्साहात संपन्न
मुख्याध्यापक . नामदेव मावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मांगीलाल बाबुराव जाधव, सौ. शितल दिनेश भदोले, सौ. शिला सुभाष सदगीर, सौ. ज्योती जीवन बागुल, सौ. उषा संजय चौधरी.

. पंढरीनाथ एकनाथ कटवर, . लक्ष्मीकांत शिवाजी खैरनार, . नवाब शेख नसीर,. धर्मराज राधेश्याम कहार,. संदीप लिलाधर माहिर, . राजू सिद्धार्थ पवार,. रविंद्र गोपाळदास शर्मा, . रविंद्र बापुराव जाधव तसेच . संदीप कारभारी काकळीज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. विविध अनुभव, यशोगाथा आणि जुन्या आठवणींमुळे वातावरण भावनिक व आनंददायी झाले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षण, करिअर आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक . नामदेव मावळ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल करावे, समाजात आदर्श नागरिक म्हणून कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात परस्पर संवाद, आठवणींची देवाणघेवाण आणि स्नेहभोजन यामुळे सर्वांनी आनंददायी क्षण अनुभवले.
संपूर्ण कार्यक्रम मैत्री, स्नेह आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही नियमितपणे करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!