नांदगाव बाजार समितीचा महत्त्वाचा निर्णय : उद्याचा बैल बाजार बंद, शेळी-मेंढी बाजार नियमित सुरू
Nandgaon news
नांदगाव बाजार समितीचा महत्त्वाचा निर्णय : उद्याचा बैल बाजार बंद, शेळी-मेंढी बाजार नियमित सुरू
वेगवान मराठी : मारुती जगधने दि . २० मे 20२६
दर गुरुवारी भरविण्यात येणारा नांदगांव प्रसिद्ध जनावरांचा बैल बाजार उद्या गुरुवार, दिनांक २१ मे २०२६ रोजी बंद राहणार असल्याची अधिकृत माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. या निर्णयाची नोंद सर्व शेतकरी, पशुपालक आणि व्यापारी बांधवांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदगाव बाजार समितीच्या यार्डमध्ये दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावर बैल, गायी तसेच इतर मोठ्या जनावरांची खरेदी-विक्री होत असते. मात्र, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उद्याचा गोवंशीय जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बैल जोड्या किंवा विक्रीसाठीची मोठी जनावरे बाजारात आणू नयेत, जेणेकरून त्यांची गैरसोय टळेल.
शेळी, बोकड आणि मेंढी बाजार मात्र नियमित
बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय केवळ बैल व मोठ्या जनावरांच्या बाजारापुरता मर्यादित आहे. शेळी, बोकड, मेंढी, कोंबडी आदी लहान जनावरांचा बाजार नेहमीप्रमाणे नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे या जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी व शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येणार नाही.
बाजार समितीचे आवाहन
बैल बाजार बंद राहणार असल्याने सर्व विक्रेते, व्यापारी आणि शेतकरी बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे व योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन यांच्या वतीने करण्यात आले आहे.



