नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्काराच्या मानकरी ठरल्या .प्रतिभा पवार ,खैरनार

Nandgaon news

यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्काराच्या मानकरी ठरल्या .प्रतिभा पवार ,खैरनार
वेगवान मराठी : मारुती जगधने

दि १४मार्च २०२६    नांदगाव येथील नांदगांव चे भुषण  कवयित्री सौ. प्रतिभा पवार-खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ या कवितासंग्रहास पुणे येथील स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे,

ठळक मुद्दे:
​पुरस्काराचे ४० वे वर्ष: हा पुरस्कार वितरणाचा ४० वा वर्ष सोहळा आहे.
​पुरस्कार वितरण सोहळा: १२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते. खा . सुनीलजी तटकरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला .
​पुरस्काराचे स्वरूप: ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र.
​इतर सन्मान: प्रतिभा खैरनार यांना यापूर्वी ‘पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार’ आणि ‘पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ मिळाले आहेत.
​साहित्यिक कारकीर्द: हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह असून, त्यांच्या नावावर एक कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहे. त्यांनी ‘दैनिक सांज सह्याद्री’ दै आवाज नांदगाव . शेतकरी टाईम्स  साठी स्तंभलेखनही केले आहे.
​नाशिक आणि नांदगाव परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . या प्रसंगी

विजय ढेरे, सुनील टिंगरे, दत्ता धनकवडे, सचिन जाधव, मोहन जोशी, संजय ढेरे, रामदास फुटाणे, गौरव फुटाणे, माधव गोगावले ( अमेरिका) भरत दौंडकर, अभिनेता महेश कोठारे इत्यादी मंचावर उपस्थित होते .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!