नाशिक ग्रामीण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकारिणी जाहीर

Nandgaon news

 

वेगवान मराठी : मारुती जगधने

दिनांक 16 फेब्रुवारी 2026

नांदगाव
येथील देवीदास मोरे यांच्या कार्यालयात नुकतीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत नांदगाव शाखेची 2026–27 या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.
बैठकीस राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके यांनी भ्रमणध्वनीद्वारे मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे होते.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: भगीरथ जेजुरकर
उपाध्यक्ष: देवीदास मोरे
उपाध्यक्ष: सर्पमित्र प्रभाकर निकुंभ
कार्याध्यक्ष: प्रज्ञानंद दयानंद जाधव
प्रधान सचिव: प्रा. सुरेश माधवराव नारायणे
बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह: मंगेश अंबादास आहेर
विविध उपक्रम विभाग कार्यवाह: प्रा. विक्रम दिनकर घुगे
वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह: प्रा. रवींद्र बबनराव सुरसे
प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग: संजय विठ्ठल कांदळकर
अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका व विवेक विचार प्रकाशन: मारुती भिकाजी जगधने व नाना सुरेश अहिरे
महिला प्रतिनिधी व कायदे विषयक व्यवस्थापन: अॅड. विद्या कसबे
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक मारुती जगधने यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करताना समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना आणि विवेकी विचारांचा प्रसार यासाठी कटिबद्धपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीच्या शेवटी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला असून, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!