खबरदार …. केवळ दिव्यांगांना ” लक्ष ” कराल तर —
दिव्यांग संघटनेचा प्रशासनावर - प्रहार .... काय आहे प्रकरण

…वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
“केवळ दिव्यांगाला लक्ष करू नका; हिंमत असेल तर संपूर्ण NH 160 महामार्गावरील अतिक्रमणे काढा… !
सिन्नर ; दि .16 फेब्रुवारी 2026 –
पांगरी येथील एका दिव्यांग बांधवाच्या पोटापाण्यावर गदा आणणाऱ्या प्रशासनाने आपला दुजाभाव थांबवावा. जर तुम्हाला केवळ दिव्यांगाचेच अतिक्रमण दिसत असेल, तर आता आमची मागणी आहे की, संपूर्ण NH 160 (नाशिक-शिर्डी महामार्ग) वरील सर्व धनदांडग्यांची अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत. भेदभाव करणाऱ्या प्रशासनाला आता उच्च न्यायालयात खेचू, असा इशारा प्रहार दिव्यांग संघटनेचे सिन्नर तालुकाध्यक्ष
अरुण भाऊ पाचोरे, दत्तात्रेय लोंढे
गणपत नाटे, वैभव वेलजाळी यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
पांगरी येथील श्री. खैरे या दिव्यांग बांधवाला व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देऊन ग्राम प्रशासनाने आजपर्यंत केवळ वेळकाढूपणा केला आहे. NHAI च्या कारवाईपासून वाचवण्यासाठी युवानेते निखिल भाऊ भेंडाळे यांनी मध्यस्थी करून प्रशासनाला वेळ दिला होता. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी स्वतः वेळ देऊनही कार्यालयात दांडी मारली आणि दिव्यांग बांधवाचे फोन उचलले नाहीत. प्रशासनाच्या या ‘अडमुठ्या’ आणि ‘अशोभनीय’ वागणुकीमुळे आता हा संघर्ष तीव्र झाला आहे.
दत्तात्रेय लोंढे यांचा कडक इशारा:
“प्रशासनाला हायवेवर केवळ गरिबांची आणि दिव्यांगांचीच छोटी दुकाने दिसतात का? NH 160 वर अनेक ठिकाणी मोठमोठ्या रथी-महारथींनी अतिक्रमणे केली आहेत, तिथे कारवाई करताना प्रशासनाचे हात का थरथरतात? जर पांगरीतील दिव्यांग बांधवावर कारवाई झाली, तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून संपूर्ण NH 160 महामार्गावरील एक-एक अतिक्रमण काढायला लावू. मग जे काही परिणाम होतील, त्याला प्रशासन जबाबदार असेल.”
पुढील पाऊल:
या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी प्रहार संघटना लवकरच मा. बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत सिन्नर येथे महामुर्चा काढणार आहे. निखिल भाऊ भेंडाळे यांनी गावाची शांतता जपण्यासाठी विनंती केली होती, पण प्रशासनाने त्यांच्या शब्दालाही मान दिला नाही. आता प्रशासनाने परिणामांना तयार राहावे, असेही लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
” केवळ ” दिव्यांगाला लक्ष करू नका ; हिंमत असेल तर संपूर्ण NH 160 महामार्गावरील अतिक्रमणे काढा… !
प्रहार दिव्यांग संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा; अरुण पाचोरे, दत्तात्रेय लोंढे यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे हत्यार उपसणार — ?



