- वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, दि. 12 फेब्रुवारी 2026
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गटाच्या संचालकपदी बोलठाण येथील गोकुळ बाबुलाल कोठारी यांची निवड.
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली.
माजी संचालक अमोल नावंदर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार संचालक मंडळाने ठरावाद्वारे निवड केली.
उद्घाटन समारंभ:
बाजार समितीच्या शेतकरी निवास व सभागृह नूतनीकरण कामाचे उद्घाटन समृद्धी सहकारी बँकेच्या चेअरमन सौ. अंजुमताई कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे व माजी आमदार अनिल आहेर यांच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुण्यांसह लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, माजी पं.स. सभापती विलास आहेर, माजी संचालक विष्णू निकम, अनिल रिंढे, गुलाब भाबड, किरण कांदे, रिखबशेठ पाटणी आदींचा सत्कार.
नवनिर्वाचित संचालक गोकुळ कोठारी व माजी संचालक अमोल नावंदर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार.
उपस्थित मान्यवर:
सभापती दर्शन आहेर, उपसभापती अनिल सोनवणे यांच्यासह संचालक व पदाधिकारी उपस्थित.
नांदगाव, बोलठाण व न्यायडोंगरी येथील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिकारी बाबासाहेब साठे यांनी केले.
फोटो ओळ:
नांदगाव बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर गोकुळ कोठारी यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करताना.



