कर्मचाऱ्यांना न्याय न दिल्यास काळे फासणार
वेगवान मराठी :मारुती जगधने
दिनांक 12 फेब्रुवारी 2026
दिनांक १०-२-२६ रोजी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षक माध्यमिक कार्यालय.नाशिक यांच्या कार्यप्रणालीबाबत या उच्च न्यायालयाने मुंबई व शिक्षणाधिकारी माध्यमिक नाशिक यांच्या मंजूर आदेशानुसार एकस्तर थकीत बील देयके कुठल्याही प्रकारचा स्थगिती आदेश नसतानाही न स्वीकारणे व शाळांच्या कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवज जमा बाबतीत पोच न देणे आदी विषयांवर तात्काळ कारवाई करावी व न केल्यास होणारे अन्याय बाबतीत प्रश्न न सोडल्यास न्यायासाठी संबंधित अधिकारी यांना काळे फासण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला
यावर महाराष्ट्र शिक्षक शिक्षकेतर परिषद अध्यक्ष प्रविण महाजन, प्रकाश बावा,अनिस पिंजारी, रत्नमाला महाजन आदींच्या सहीने देण्यात आले.



