नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

बेलदारवाडी व मल्हारवाडी येथे पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Nandgaon news

बेलदारवाडी व मल्हारवाडी येथे पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

| वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव 28 July, 2026

प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड अंतर्गत उपकेंद्र पोखरी येथील बेलदारवाडी अंगणवाडी केंद्रात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात राबविण्यात आली. बूथ क्रमांक १३ वर एकूण ६० बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला.

या मोहिमेसाठी अंगणवाडी सेविका मनीषा सोपान कदम व आशा सेविका सविता योगेश सागर यांनी विशेष परिश्रम घेतले. मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अश्विनी मुकुंद खैरनार यांनी बूथला सदिच्छा भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी पालकांना आपल्या मुलांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन केले.

पोलिओ निर्मूलनासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय मोहिमेत जन्मापासून ते ५ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येतो. बेलदारवाडीतील पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड अंतर्गत मल्हारवाडी येथे बूथ क्रमांक ८ वरही पल्स पोलिओ मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. या बूथअंतर्गत एकूण १४० लाभार्थी असून मोहिमेदरम्यान गट प्रवर्तक इंदुमती गायकवाड, आरोग्य सेवक लक्ष्मी स्वामी कार्सपल्ली व आशा सेविका पद्मा बिडवे यांनी सेवा बजावली.

अंगणवाडी व आशा सेविकांनी घरोघरी जाऊन केलेल्या जनजागृतीमुळे दोन्ही गावांतील लाभार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक राहिली. त्यामुळे पोलिओ निर्मूलनाच्या राष्ट्रीय अभियानाला बळकटी मिळाल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!