नाशिक ग्रामीण

जुन्या भांडणातून २७ वर्षीय तरुणावर गोळीबार, जीवे मारण्याचा प्रयत्न

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.४ ऑक्टो २०२५ :- जुन्या वादाची कुरापत काढून चार तरुणांनी २७ वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्याने गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना निफाड येथील जळगाव फाटा परिसरात शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने गोळ्या तरुणाला चाटून गेल्याने जीव वाचला.
निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मनोहर साळवे, वय २७, रा.सुंदरपूर हा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास असिफ किराणा दुकानासमोर उभा असताना, मयूर ढगे, रा. बेघर वस्ती, निफाड याने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा राग धरून आपल्या साथीदारांसह त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यासोबत विजय शिंदे, रा.मटण मार्केटसमोर, निफाड, विशाल केंदळे, रा. स्मशानभूमी शेजारी, निफाड आणि पृथ्वीराज जाधव, रा.काथरंगाव हे होते.
या चारही आरोपींनी साळवे याला ‘तू माजला आहेस का? थांब, तुझा बेत पाहतो’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. यावेळी पृथ्वीराज जाधव याने आपल्या लाल जॅकेटमधून गावठी पिस्तूल काढून सलग तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या साळवेच्या उजव्या कंबरेजवळील बरगडी व उजव्या खांद्याला चाटून गेल्याने त्याला दुखापत झाली, मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला.
सिद्धार्थ साळवे यांच्या फिर्यादीवरून मयूर ढगे, विजय शिंदे, विशाल केंदळे आणि पृथ्वीराज जाधव यांच्याविरोधात भारतीय न्यायदंड संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९, ३५२, ३५१(२), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शनिवारी सकाळी नाशिक येथील फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी येऊन झाडलेल्या गोळ्या जमा करून पंचनामा केला असून अहवाल सादर करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असल्याची माहिती गुरव यांनी दिली.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!