नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नांदगाव मध्ये गावठी कट्टा ( पिस्तूल )

Nandgaon news

नांदगावमध्ये ‘गावठी कट्टा’ बाळगणाऱ्यासह दोघांवर कारवाई; पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

वेगवान मराठी मारुती जगधने

दिनांक 11 मार्च २०२६

नांदगाव शहरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका खाजगी मेडिकलमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्याला शस्त्र विकणाऱ्या साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईचे नांदगाव शहरातील नागरिकांनी पोलिसांचे स्वागत केले आहे .

​बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास, शहरातील ‘मुक्ताई मेडिकल’मध्ये संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका तरुणाची पोलिसांनी झडती घेतली. यावेळी आरोपी भावेश मधुकर खैरनार (वय २५, रा. खैरनारवाडा, नांदगाव) याच्याकडे २० हजार रुपये किमतीचा स्टील बॉडी असलेला गावठी कट्टा मिळून आला. पोलिसांनी तत्काळ तो जप्त केला आहे.

शस्त्र खरेदी-विक्रीचा उलगडा

​पोलिसी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयीत आरोपी भावेश याने हा गावठी कट्टा ढेव्या ऊर्फ रुद्राक्ष दीपक सोनवणे (रा. होलारवाडा, नांदगाव) याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस पथकाची कारवाई

​नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दत्तात्रय बाळकृष्ण सोनवणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवादार दिलीप निकम करत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार मोरे कामकाज पाहत आहेत.

​शहरात भरदिवसा अशा प्रकारे शस्त्र बाळगल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!