Uncategorizedनाशिक शहरलोकल बातम्या

शहरात चोऱ्यांचे सत्र: पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Nandgaon news

 शहरात चोऱ्यांचे सत्र: पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

 

वेगवान मराठी : मारुती जगधने

दि . १  मार्च २०२६

​नांदगाव शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भरदिवसा होणाऱ्या लुटीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • गुरुकृपानगर घरफोडी: राजाराम देवमन मोरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून ५० हजार रुपये रोख आणि चांदीचे दागिने लंपास केले.
  • सशस्त्र लुटमार (चाळीसगाव-येवला रस्ता): संदीप ऋषीकेश दराडे हे आपल्या कुटुंबासह जात असताना, तिघा संशयितांनी (बापू झाल्टे, प्रविण देव व एक अज्ञात) त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. दमदाटी करून त्यांच्याकडून ३,२४० रुपये लुटून चोरटे पसार झाले.
  • निवृत्त कर्मचाऱ्याची लूट: तांदूळवाडी येथील सेवानिवृत्त कर्मचारी सूर्यभान काकळीज यांनी बँकेतून काढलेले ३ लाख रुपये दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून पाठलाग करून त्यांच्या स्कुटीच्या डिक्कीतून चोरले.
  • महावीर मार्ग: येथे एका दुकान आणि घरावर चोरीचा प्रयत्न झाला, मात्र नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरट्यांनी पळ काढला.
  • गोविंद अ ग्रवाल यांच्या दुचाकीच्या डिक्की तून 5  लाख दुचाकी स्वारांनी रेकी करून चोरले
  • पेंढारकर बाबांच्या हातातील 27 ग्रॅम सोनेरी अंग ठी जबरीने चाकूचा धाक दाखवून भर दिवसा सकाळी साडेनऊच्या दरम्यान काढून घेतले
  • टोळी सक्रिय असण्याची शक्यता: शहरात ठराविक अंतराने होणाऱ्या या घटना पाहता एखादी संघटित टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
  • पोलिस गस्त निष्प्रभ: शहरात रात्रंदिवस गस्त वाढवल्याचा दावा केला जात असला, तरी चोऱ्यांचे सत्र थांबलेले नाही. चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.
  • नागरिकांची मागणी: वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करण्याची आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!