बोगस हटाव आदिवासी बचाव आंदोलन
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव (ता. नाशिक) येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने “बोगस हटाव – आदिवासी बचाव” अशी भव्य पायी रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या आंदोलनाचे प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या :
1. बंजारा व धनगर समाज तसेच इतर कोणत्याही समाजाला आदिवासी (ST) प्रवर्गात समाविष्ट करू नये.
2. बंजारा व धनगर समाजाला (ST) प्रवर्गात सामाविष्ट करण्याचे शिफारस पत्र देणाऱ्या आमदार व खासदार यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कारवाई करावी.
3. ST-B मध्ये कोणत्याही समाजाचे वर्गीकरण करू नये.
“जय संविधान, जय आदिवासी, जय भीम, जय जोहार” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकजूट दाखवत या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जय आदिवासी… जय जोहार च्या घोषणा देण्यात आल्या :



