चांदवडः बिबट्या च्या जोडीचा दोन शेतकऱ्यांवर जीव घ्यायला हल्ला

वेगवान मराठी
वडनेर भैरव ता. 11 प्रतिनिधी चांदवड तालुक्यातील केद्राई देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडक ओझर या गावी शेतात गहू या पिकाला पाणी देत असलेल्या दोन सख्ख्या भावांवर दोन बिबट्यांनी अचानक जीवघेणा हल्ला केल्याने ते शेतकरी झटापट करीत त्या हल्ल्यातून सुदैवाने वाचलेले आहेत या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि घबराट निर्माण झालेली असून गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट असल्याची चर्चा आज प्रत्यक्ष गावकऱ्यांनी अनुभवली.
खडक ओझर येथील शेतकरी श्री नंदू मोतीराम पगार व श्री बबन मोतीराम पगार हे शेतात गहू या पिकाला बारे देत असताना गव्हाच्या शेतात शिकार खात असलेल्या बिबट्यांच्या जोडीने शेतकऱ्यांवर हल्ला केला.
या झटापटीत शेतकरी यांच्या पोट हात आणि पाठ या भागांना पंजा आणि दातांनी बऱ्यापैकी जखमा केलेले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की नंदू पगार व बबन पगार हे गहू या पिकाला पाणी भरत असताना याच शेतात लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. शेतकऱ्यांनी बिबट्याशी झटापट करीत असताना त्यांचा मोबाईल त्या ठिकाणी पडला म्हणून ते आणण्यास जात असतानाच त्याच शेतामध्ये दुसरा दबा धरून बसलेला बिबटणे या शेतकऱ्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला केला.
आजूबाजूच्या लोकांनी या बिबटच्या जोडीला मोठ मोठे ने आवाज करत पिठाळून लावले परंतु या भागांमध्ये प्रचंड दहशत बिबट्यांची झालेली आहे.
जखमींना वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी घेण्यात आले तेव्हा तेथे जी लस प्रतिबंधात्मक दिली जाते ती उपलब्ध नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दोन्ही जखमींना नाशिक शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले.
या हल्ल्यामध्ये दोन्ही शेतकरी प्रचंड भीतीच्या सावटाखाली असून हात पोट आणि पाठ या भागांवर कमी अधिक प्रमाणात जखमा झालेल्या असल्याने बऱ्यापैकी रक्तस्त्राव झालेला आहे.
चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे, वनपाल वाल्मीक व्हरगळ, वनरक्षक चंद्रकांत मार्गे पाड, किशोर मोहिते वनमजूर वसंत देवरे श्री भारत वाघ व अशोक शिंदे यांच्या मदतीने रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी वन विभागाने मदत करीत आजच तेथे पिंजरा लावला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांचे कुत्रे यांना बिबट्यांनी लक्ष केले आणि आता ते थेट माणसांवरच चाल करीत असल्याकारणाने अनेक लोक भीतीच्या सावट खाली आहे.खडक ओझर वडनेर भैरव शिरवाडे वनी खंडळवाडी पिंपळ नारे या परिसरात सतत बिबट्यांचा वावर असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेती काम गतीवर होत आहे.



