नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

राष्ट्रीय महामार्गावरील बंद स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर शिवसेनेचा टोलनाका बंद करण्याचा इशारा

Nandgaon news

राष्ट्रीय महामार्गावरील बंद स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
शिवसेनेचा टोलनाका बंद करण्याचा इशारा
वेगवान मराठी : मारुती जगधने
 दिनांक . ७ फेब्रुवारी 2026
नांदगाव शहरासह चाळीसगाव–नांदगाव–मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ जे वरील नांदगांव  फुलेनगर ते गंगाधरी या परिसरात बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिक व वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चाळीसगाव–नांदगाव–मनमाड–चांदवड मार्गे नाशिककडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय वर्दळीचा असून रस्त्यावर ठिकठिकाणी काटेरी झाडे खड्डे तयार झाली झाडे आतपर्यंत आलेली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची साफसफाई व स्वच्छता करणे अत्यावश्यक असून दुभाजकावरील झाडे सुकू लागल्याने त्यांना पाणी देणेही गरजेचे आहे. तसेच महामार्गावरील अनेक ठिकाणचे पथदीप बंद अवस्थेत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी भुरट्या चोरट्यांचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांना अडवून लुटमार केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.? असे असतानाही रस्त्याची कोणतीही देखभाल-दुरुस्ती (मेंटेनन्स) न करता टोल वसुली मात्र नियमितपणे सुरू असल्याने वाहनधारकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार सुहास  कांदे यांच्या आदेशान्वये शिवसेना नांदगाव शहरच्या वतीने पिंपरखेड टोल प्लाझा येथे टोल व्यवस्थापकांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना सद्यस्थितीची जाणीव करून देत फुलेनगर ते गंगाधरी दरम्यानचे स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना नांदगाव शहरप्रमुख सुनील जाधव यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना सांगितले की, येत्या दोन ते तीन दिवसांत संबंधित स्ट्रीट लाईट सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल व पिंपरखेड येथील टोलनाका बंद करण्यात येईल. तसेच या टोल नाक्यावर इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांकडून टोल आकारला जात असून, इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी असतानाही हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या आंदोलनातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, अशी तंबी यावेळी देण्यात आली. या प्रसंगी शिवसेना तसेच युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!