स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रातील चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश… आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी — !
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर दि ; 7 फेब्रुवारी 2026 — मंदिरातील चोरी करणार्या चोरांचा वावी पोलिसांनी केला पर्दाफाश..
गेल्या काही दिवसापासून चोरांनी आपला मोर्चा मंदिरात वळवल्याने ग्रामीण भागातील मंदिरातील चोऱ्यांची सत्र थांबतात थांबेना .गेल्या काही दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रातील पूजेच्या महागड्या वस्तूचा तांबे पितळे व चांदीच्या साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली होती. याबाबत कारवाडी येथील सेवेकरी विकास अशोक जाधव यांनी वावी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती .त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत व सीसीटीव्ही व्हिडिओचा आधार घेत चोरांचा माग काढत संबंधित आरोपी ताब्यात घेऊन त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
श्री स्वामी समर्थ केंद्रातील काही दिवसापूर्वी चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम .सात किलो वजनाच्या व तीन फूट लांबीच्या दोन समया. चोरून नेल्या होत्या. याबाबतचा सीसीटीव्ही समोर आल्याने स्वामी भक्तात एकच संतापाची लाट उसळली होती.
या अनुषंगाने गुन्हा पोलीस अधीक्षक ( नाशिक ) ग्रामीण बाळासाहेब पाटील .आप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर. उपविभागाय विभागीय पोलीस अधिकारी ( निफाड ) के .के .पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर. पोलीस निरीक्षक विजय कोठावळे. दत्तात्रय कोळपे. शहाजी शिंदे. गणेश पवार. सागर सारंगधर .तुषार दयाळ. बाळासाहेब सानप. विक्रम लगड . यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे. व चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या. या तपासकामी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी विशेष तपास पथक स्थापन करून त्यांना गुन्ह्याची तपासबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सूचना केल्या होत्या पथकातील गणेश पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणत सर गुन्ह्यातील चोरी करण्यात आलेल्या वस्तूसह चोरी करणारा आरोपी मच्छिंद्र संपत वाघ.( वय 47 )राहणार माहेगाव देशमुख. तालुका कोपरगाव. जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेत पोलिसांनी दोन पितळी समई माहेगाव देशमुख येथील स्मशानभूमीच्या जवळ लपून ठेवल्या होत्या .त्या पोलीस तपासात हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीने इतर ठिकाणी देखील अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या असल्याचा संशय असून त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर होण्याचा तपास करून चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या .वावी पोलिसांना यश आल्याने व पोलीस स्टेशन ने दाखवलेली तत्परते बाबत स्वामी भक्तामध्ये समाधान व्यक्त होत आहे.



