नाशिक ग्रामीण

दारूच्या नशेत चक्कर येऊन पडल्याने ट्रॅक्टरच्या चाकाजवळ सापडून शेतमजुराचा मृत्यू

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद:- दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अशोक रामदास मोरे यांच्या शेतात काम करत असताना दारूच्या नशेत चक्कर आल्याने खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकाजवळ सापडल्याने एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकद येथे घडली.
मयताचे नाव संजय चिंधु पवार (वय ५३) असून, याबाबत त्यांचे धाकटे भाऊ विजय चिंधु पवार यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. खबरीनुसार, संजय पवार हे दारू पिऊन शेतात काम सुरू असताना ट्रॅक्टरजवळ उभे होते. त्यावेळी दारूच्या नशेमुळे चक्कर आल्याने ते खाली पडले. याच वेळी ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीजवळून गेल्याने ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सायंकाळी सुमारे सात वाजता उपजिल्हा रुग्णालय, निफाड येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले.
या घटनेची नोंद लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ०२/२०२६ नुसार भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार औदुंबर मुरडनर करीत आहेत.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!