एकल महिलांना दिला ध्वजारोहण मान … या गावाच्या महिला सरपंचांचा कौतुकास्पद निर्णय — !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर दि ; 26 जानेवारी 2026 — सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा गावकऱ्यांनी घडवला आदर्श… विधवा ( एकल )महिलांसाठी मानसन्मान… राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वसमावेशक व सामाजिक ऐक्य जपवुन समाजाला दिला नवा संदेश देण्यात आला… गावाच्या महिला सरपंच व उपसरपंच यांनी हा निर्णय कौतुकास्पद कामगिरी म्हणजे दुर्लक्षित असलेल्या महिला चा आत्मसन्माना बरोबरच नवी उमेद व दाकत दिली.
एकल (विधवा) महिलांना ध्वजपूजन व ध्वजारोहणाचा सन्मान करण्यात आला.
घोटेवाडी गावात सामाजिक समतेचा आदर्श ठेवणारा उपक्रम साकारत गावातील एकल (विधवा) महिलांना ध्वजपूजन व ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न ठरला.
सरपंच मंजुश्री घोटेकर आणि उपसरपंच रंजना घोटेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या एकल महिलांना सन्मान देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सशक्तपणे सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ध्वजपूजन व ध्वजारोहणाचा मान लाभलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व अभिमान झळकत होता. याप्रसंगी सुटीवर आलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील ज्ञानेश्वर ढमाले, सागर सरोदे, अक्षय बच्छाव, आरती घोटेकर यांनाही ध्वज पूजनाचा मान देण्यात आला.



