नाशिक ग्रामीण

नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चांदोरी शिवारात, कसबे सुकेणे फाट्याजवळ एस.टी. बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पत्नी जखमी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद ता.२१ जाने २०२६ :- नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चांदोरी शिवारात, कसबे सुकेणे फाट्याजवळ एस.टी.बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नीला दुखापत झाली आहे.
दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास दारणासांगवी, ता. निफाड येथील भाऊसाहेब महादू काकड, वय ७५ हे पत्नी सुलोचना भाऊसाहेब काकड, वय ६८ यांच्यासह हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र.एम.एच.१५ जे.जी.४२५५ वरून जात असताना लासलगाव डेपोची एस.टी.बस (क्र.
एम.एच.१४ बी. टी.३३४४ ने भरधाव वेगात व निष्काळजीपणे पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार भाऊसाहेब काकड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर नाशिक येथील सी.एन.एस. हॉस्पिटल, मुंबई नाका येथे उपचार सुरू असताना दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. अपघातात सुलोचना काकड यांच्या पाठीला मुक्का मार लागून त्या जखमी झाल्या आहेत तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी केशव भाऊसाहेब काकड (वय ४३, रा.दारणासांगवी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एस.टी.चालक सतिष जगतराव वडाळ (नेमणूक लासलगाव बस डेपो) याच्याविरुद्ध सायखेडा पोलीस ठाण्यात बी.एन.एस. २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक संदीप घुगे करीत आहेत.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!