नाशिक ग्रामीण
एस.के.डी. स्कूलच्या टॅलेंटचा डंका; मुलींच्या क्रिकेट संघाची राज्यस्तरावर झेप!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल, येवला येथे आयोजित १४ वर्षांखालील मुलींच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत देवळा तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने दैदिप्यमान कामगिरी करत राज्यस्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे.
या स्पर्धेत एकूण सहा नामांकित संघांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात एस.के.डी. स्कूलच्या मुलींनी चावरा इंटरनॅशनल स्कूल, नंदुरबार या संघाचा पराभव केला आणि विजेतेपदावर मोहोर उमटवली. या विजयामुळे या संघाची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अदिनी पाटील, श्रावणी आहेर, तनिष्का पगार, सिद्धी शेवाळे, अनंती आहेर, वेदिका मोरे, वेदिका केकान, शर्वरी पवार, पूर्वा निकम, अपेक्षा पवार, तन्वी पगार, जागृती कापडणीस, वेदश्री कापडणीस, काव्या सावकार, लावण्या अहिरे. या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी संघाला क्रीडाशिक्षक मुदसर सय्यद, ययाती जाधव, किरण चव्हाण, राजू देवरे आणि मंजुषा शेवाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे आणि प्राचार्य एस.एन. पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे कौतुक करून त्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



