नाशिक ग्रामीण

दानशूर दांपत्याचा आदर्शवत उपक्रम : पुरकर दांपत्याकडून सव्वा कोटी रुपयांची जमीन दान

Nandgaon News

दानशूर दांपत्याचा आदर्शवत उपक्रम : पुरकर दांपत्याकडून सव्वा कोटी रुपयांची जमीन दान

वेगवान मराठी : मारुती जगधने

श्री क्षेत्र परधाडी, ता. नांदगाव जि . नाशिक  येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य असलेले सेवनिवृत्त शिक्षक  रमेश पुरकर व त्यांच्या सौभाग्यवती यांनी समाजापुढे दानशूरतेचा आदर्श ठेवणारा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

या दांपत्याने जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांना दि २९ डिसेबर  रोजी चार एकर बागायती जमीन दान स्वरूपात अर्पण केली आहे.
पुरकर दांपत्याचे आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याशी असलेले नाते अनेक वर्षांपासून दृढ आहे. यापूर्वीही त्यांनी गोशाळा, मंदिर व गुरुकुल यांच्या उभारणीसाठी एक एकर जमीन दान करून समाजहितासाठी आपले योगदान दिले होते. त्यातच आता पुन्हा चार एकर सुपीक बागायती जमीन दान करून त्यांनी आपल्या श्रद्धा व सेवाभावाची प्रचिती दिली आहे.
सद्यस्थितीत या भागातील जमिनीचे बाजारमूल्य प्रति एकर सुमारे २५ लाख रुपये असून, पुरकर दांपत्याने आतापर्यंत सुमारे सव्वा कोटी रुपयांहून अधिक किमतीची जमीन बाबाजींना दान दिलेली आहे. निवृत्त शिक्षक असूनही केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता समाज घडविण्यासाठी आपली आयुष्यभराची कमाई त्यांनी लोककल्याणासाठी अर्पण केली आहे.
या दानामुळे धार्मिक, आध्यात्मिक व शैक्षणिक उपक्रमांना मोठा हातभार लागणार असून भावी पिढीसाठी संस्कारक्षम वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांनी या दानाबद्दल पुरकर दांपत्याचे मनःपूर्वक आभार मानत, “अशा दानशूर व्यक्ती समाजाचा खरा आधारस्तंभ असतात,” असे गौरवोद्गार काढले.
पुरकर दांपत्याचा हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून, त्यांच्या कार्यामुळे इतरांनीही समाजहितासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रद्धा, त्याग व सेवाभाव यांचा सुंदर संगम म्हणजेच पुरकर दांपत्याचे हे कार्य होय.

खरेदी विक्री कार्यालय नांदगाव येथे जाऊन पुरकर परिवारांनी संत शांतिगिरी महाराज यांना सदर जमीन दान केल्याचे अधिकृत करण्यात आले यावेळी संबंधित कार्यालयातील अधिकारी पुरकर दांपत्ये आणि नागरिक उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!