
वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला,दि.२८ डिसेंबर :-शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा तसेच शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक गोडाऊन उभारण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पणन हंगाम शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शासकीय गोदाम, कोपरगाव रोड,येवला येथे मकरंद सोनवणे यांच्या सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार,ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, तहसीलदार आबा महाजन, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भोलाशेठ लोणारी, बंडू क्षीरसागर, प्रदीप सोनवणे,भाजपचे नेते प्रमोद सस्कर, नाना लहरे, राजुसिंग परदेशी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,किसनकाका धनगे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,दत्ता निकम, राजेश भांडगे, गुड्डू जावळे, नगरसेवकदीपक लोणारी, प्रवीण बनकर, गोटू मांजरे, जावेद लखपती, सचिन शिंदे, मुश्ताक शेख, गणेश गायकवाड,नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, बापू काळे, सचिन साबळे, मच्छिंद्र थोरात, विजुनाना खोकले, एकनाथ जानराव, राजेंद्र काकळीज, विजय खैरनार, समाधान जेजुरकर, सुमित थोरात, गणेश गायकवाड, मलिक मेंबर, अमोल सोनवणे, अशोक एंडाईत, कांतिलाल सोनवणे, गणपत कांदळकर, सुदाम सोनवणे, उज्वल जाधव, बाबासाहेब सोनवणे, म्हसु शिंदे, रघुनाना जाधव, नितीन जाधव, सुनील सपकाळ, ज्ञानेश्वर घोडके, अर्जुन ढमाले, प्रकाश सोनवणे, कारभारी ढोले, जनार्दन जानराव, भाऊसाहेब दाभाडे, भाऊसाहेब जाधव, समाधान पगारे, दत्तात्रय थोरात, महेश गादेकर, दीपक पवार, सतीश पैठणकर, सचिन गवळी, गणेश गवळी, मयूर सोनवणे,संस्थेचे चेअरमन भगवान घोडके यांच्यासह पणन विभाग, अन्न, नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होत.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मक्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने अधिक खरेदी केंद्र वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे दुसरे खरेदी केंद्र येवल्यात सुरू करण्यात आले आहे.अजूनही शेतकऱ्यांची मागणी असेल तर अधिक केंद्र निर्माण करण्यात येईल. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. तरीदेखील मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन झाले आहे. शेतकरी बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला मका पूर्णपणे वाळवून केंद्रावर खरेदी केंद्रावर आणावे असे त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक मोठे गोडाऊन उभारण्यात येईल. अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे. शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जास्तीत जास्त मका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मकरंद सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



