आरोग्य

आता यापुढे दवाखान्याची मनमानी चालणार नाही… रुग्णाला आय .सी. यु. मध्ये दाखल करण्यापूर्वी खर्च सांगणे बंधनकारक

वेगवान मराठी  / भाऊसाहेब हांडोरे

आता यापुढे रुग्णालयाचा मनमानी कारभार चालणार नाही… आय सी यु चा खर्च आधी सांगणे बंधनकारक … !

सिन्नर . दि : 22 डिसेंबर 2025 —  राज्यातील खाजगी रुग्णालयासह सहकारी निमसरकारी रुग्णालयांना आता सरकारचा चाप बसला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णाच्या उपचाराबाबत अनेकदा नातेवाईक यांना अचानक मोठ्या बिलाचा सामना करावा लागतो मात्र आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत रुग्णांच्या हक्काला संरक्षण दिन आहे. आय. सी .यु. व्हेंटिलेटर खर्च आधी सांगणं बंधनकारक आहे .शिवाय यासाठी नातेवाईकांची परवानगी ही गरजेची आहे. नवीन नियमानुसार आय सी यु आणि व्हेंटिलेटर चा खर्च आधीच स्पष्ट सांगावा लागणार आहे. व्हेंटिलेटर वर रुग्ण ठेवण्याआधी कुटुंबाची लेखी संमती बंधनकारक आहे. व्हेंटिलेटर का लावायचा. किती दिवस लागतील .धोके काय आहे. संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. मशीन बंद असताना अनावश्यक शुल्क आकारता येणार नाही. प्रत्येक रुग्णालयात तक्रार निवारण व्यवस्था असणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता यापुढे रुग्णालयाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही आणि तसेच चालणार पण नाही आयसीयू चा खर्च आधी सांगणे प्रत्येक रुग्णालयाला बंधनकारक आहे.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!