सिन्नर परिषदेत माणिकराव कोकाटे यांचे वर्चस्व सिद्ध ; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले विराजमान …!
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर मध्ये खासदार राजाभाऊ गटाला धक्का… आमदार माणिकराव कोकाटे यांचे वर्चस्व कायम… ! तर भाजपची पीछेहाट —
@ भाजपचे अनिल सरवार विजयी @
सिन्नर नगर परिषदे त प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपचे अधिकृत उमेदवार युवा नेतृत्व अनिल सरवार यांचा बहुमताने विजय झाला आहे … या विजयानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून कार्यकर्त्यांमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे…
सिन्नर नगर परिषदेत राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले नगराध्यक्षपदी विराजमान…. …
सिन्नर दि ; 21 डिसेंबर 2025 —
सिन्नरच्या नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत माजी मंत्री व आमदार माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी गटाकडून निवडणूक रिंगणात असलेले विठ्ठल राजे उगले यांचा दणदणीत विजय झाला असून माणिकराव कोकाटे यांनी आपला राजकीय धबधबा पुन्हा कायम सिद्ध केला आहे.
या निवडणुकीत माजी मंत्री कोकाटे यांच्या अस्तित्वाला आव्हान देण्यासाठी सर्वच राखीव पक्षांनी दंड थोपटले होते. त्यातील मित्रपक्ष व सत्ताधारी भाजपने आपला उमेदवार उभा करून कोकाटे यांना आव्हान दिले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर चक्क श्री कोकाटे यांच्या गटातील माजी नगराध्यक्ष पदाची मातब्बर नेते यांना गळाला लावून श्री हेमंत वाजे यांना उमेदवारी देऊन कोकाटे यांना कोंडीत सापडण्याचा प्रयत्न केला होता तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने सुद्धा आपली बाजू पणाला ला लावून खा. वाजे यांनी आक्रमक प्रचाराची भूमिका घेऊन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला व त्याला काही प्रमाणात यशही आले आणि नगरसेवक म्हणून दोन नंबरचा पक्ष नगरपरिषद ठरला आहे.
सिन्नर नगरपालिका निवडणूक विजयी उमेदार
▫️
नगराध्यक्ष = सिन्नर नगरपरिषद
विठ्ठल उगले – राष्ट्रवादी काँग्रेस
▫️प्रभाग क्रमांक = 1
मनीषा खोळंबे – शिवसेना ठाकरे
बाळू उगले – राष्ट्रवादी काँग्रेस
▫️प्रभाग क्रमांक = 2
सविता कानडी – शिवसेना ठाकरे
पंकज जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
▫️प्रभाग क्रमांक = 3
कांताबाई जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
शेखर गोळेसर – राष्ट्रवादी काँग्रेस
▫️प्रभाग क्रमांक = 4
शोभा जाधव – शिवसेना शिंदे
सागर भाटजीरे – राष्ट्रवादी काँग्रेस
▫️प्रभाग क्रमांक = 5
उदय गोळेसर – बिनविरोध – शिवसेना ठाकरे
मनीषा गवळी – राष्ट्रवादी काँग्रेस
▫️प्रभाग क्रमांक = 6
लक्ष्मी पवार – चिट्ठी पद्धत – शिवसेना ठाकरे
मनोज देशमुख – शिवसेना ठाकरे
▫️प्रभाग क्रमांक = 7
सागर कोथमीरे – शिवसेना ठाकरे
अंबिका धनगर – शिवसेना ठाकरे
▫️प्रभाग क्रमांक = 8
संध्या कासार – शिवसेना ठाकरे
हर्षद देशमुख – राष्ट्रवादी काँग्रेस
▫️प्रभाग क्रमांक = 9
अजय गोजरे – राष्ट्रवादी काँग्रेस
ललिता हांडे – राष्ट्रवादी काँग्रेस
▫️ प्रभाग क्रमांक = 1 व 0
अनिल सरवार – भाजप
आशा कर्पे – भाजप
▫️ प्रभाग क्रमांक = 1 व 1
कमळाबाई पगार – शिवसेना ठाकरे
शुभम वारुंगसे – शिवसेना ठाकरे
▫️प्रभाग क्रमांक = 1 व 2
सुदर्शन नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस
निशा बोडके – शिवसेना ठाकरे
प्रभाग क्रमांक = 1 व 3
अमोल झगडे – शिवसेना ठाकरे
गीता वरंदळ – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक = 1 व 4
पंकज मोरे – शिवसेना ठाकरे
ज्योती मोरे – शिवसेना ठाकरे
प्रभाग क्रमांक 1 व 50
विलास जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
सुवर्णा उबाळे – राष्ट्रवादी काँग्रेस.
▫️नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवक जागा =
नगराध्यक्ष = राष्ट्रवादी काँग्रेस
▫️नगरसेवक =
शिवसेना ठाकरे = 14
राष्ट्रवादी काँग्रेस = 13
भाजप = 2
शिवसेना शिंदे = 1
(1 बिनविरोध, 1 चिट्ठी पद्धतीने) काढण्यात आले आहे..




