नाशिक ग्रामीण

दहिवड येथील २६ वर्षीय तरुण घर सोडून बेपत्ता; आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

दहिवड येथील २६ वर्षीय तरुण घर सोडून बेपत्ता; आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

मनोज वैद्य /देवळा प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील दहिवड येथील माकोण्या मळा परिसरात राहणाऱ्या दादाजी पांडुरंग भारती यांचा मुलगा सचिन दादाजी भारती (गोसावी) हा तरुण दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता घर सोडून निघून गेला आहे. सदर तरुणाच्या घरच्या मंडळींनी नातेवाईक तसेच परिसरात सर्वत्र शोधाशोध करूनही तरुण आढळून न आल्याने देवळा पोलिसात मुलाची आई सौ सुरेखा दादाजी भारती यांनी खबर दिल्याने पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.


सदर तरुण शरिराने सडपातळ असून त्याची उंची १६५ सेंमी आहे. त्याचा रंग सावळा, केस काळे, उजव्या हातावर “राम” नाव गोंदलेले आहे. घर सोडुन जाताना त्याने अंगात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची नाईट पॅण्ट घातलेली होती. त्याला मराठी, अहिराणी भाषा बोलता येतात. सदर तरुण कुणाला आढळून आल्यास किंवा त्याच्याबद्दल काही माहिती असल्यास ८९९९२६५३०६ किंवा (०२५९२) २२८२३३ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन देवळा पोलीस व मुलांच्या पालकांच्या वतीने करण्यात येत आहे.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!