नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात पुन्हा महसूल विभागाची कारवाई ; सायखेडा – भेंडाळी रोडवर अवैध गौण खनिज वाहतूक पकडली

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक ८ डिसेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील सायखेडा ते भेंडाळी रोडवर महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारा हायवा जप्त केला. रोशनी भरत पटेल, वय ३५, ग्राममहसूल अधिकारी, सायखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.०७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास हरे राम पेट्रोल पंपाजवळ सायखेडा येथे ही कारवाई करण्यात आली.
अमोल बाळु फड, रा.महाजनपुर आणि विशाल धोंडीराम कापसे रा.भेंडाळी, ता. निफाड हे दोघे मिळून नंबर प्लेट नसलेला, चेसी क्रमांक एम.ए.टी. ४४८०८५१३०२३५४८ या हायवा वाहनातून विनापरवाना ०६ ब्रास गौण खनिज (किंमत अंदाजे रु.३६ हजार रु.)
बेकायदेशीर वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे करीत आहेत.
निफाड तालुक्यातील अवैध चोरी पकडण्याची ही चौथी पाचवी घटना ही कार्यवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती निफाडचे तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे. त्यामुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!