नाशिक ग्रामीणनाशिक शहर

भल्या सकाळी गाईंचे दूध काढायला गेलेल्या शेतकऱ्याला दिसले असे काही… अंगाचा थरकाप

 

 

शरद शेळके/वेगवान नाशिक

तालुक्यातील एकलहरे येथे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास  बिबट्याने शेळ्यांवर हल्ला  केला.  यात शेतकऱ्याच्या तीन बकऱ्या बिबट्याने ठार केल्या.

 

गावाशेजारीच शेतकरी संतोष प्रभाकर शेळके यांचा गट नंबर ३० येथे गाय व शेळ्यांचा गोठा आहे.  शेळके हे सकाळी सातच्या सुमारास गाईंचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांच्या समोर बिबट्याने तीन बकऱ्या फस्त तर चौथ्या शेळीवर ताव मारत असताना दिसला. शेळके यांनी तात्काळ हातातील दुधाचा कॅन वरती करून आरडा ओरडा केला. बिबट्याची चलबिचल झाली, बिबट्याने शेळके यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु शेळके यांनी जोर जोरात हात- वारे करत आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने गोंधळून जाळीच्या वरतून उडी मारून पसार झाला.

सात फूट उंच लोखंडी जाळी मारलेल्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून बकऱ्या फस्त केल्याने परिसरातील नागरिक  भयभयित झाले आहे

घटनेची माहिती पोलीस पाटील कैलास घुले यांना मिळताच त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क केला. वनपाल संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला व घटनास्थळावर पिंजरा लावला आहे.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!