नाशिक ग्रामीण

एसकेडी इंटरनॅशनल स्कूलचा गौरव! १९ व्या राष्ट्रीय स्काऊट गाईड जंबोरीत महाराष्ट्राचे नेतृत्व

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : भावडे ता. देवळा येथील एसकेडी (SKD) इंटरनॅशनल स्कूलने लखनऊ येथे नुकत्याच पार पडलेल्या डायमंड जुबिली १९ व्या राष्ट्रीय भारत स्काऊट गाईड जंबोरीत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या भव्य सोहळ्याच्या उद्घाटन समारंभात, एसकेडी इंटरनॅशनल स्कूलमधील सहा विद्यार्थ्यांची महाराष्ट्राच्या ‘गार्ड ऑफ ऑनर’ (Guard of Honor) साठी निवड झाली.

गौरवशाली प्रतिनिधित्व

या पथकाचे नेतृत्व कमांड लीडर कौशल खैरनार याने केले. रुतुजा पगार (राष्ट्र ध्वजधारक), आनंदी कपडणीस (स्काऊट-गाईड ध्वजधारक), गायत्री खैरनार (महाराष्ट्र ध्वजधारक), आदित्य कपडणीस आणि ईशा पगार या विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्त, निष्ठा आणि दिमाखदार उपस्थितीने मान्यवरांना सलामी दिली. या सोहळ्याला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल मा. श्रीमती आनंदीबेन पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच ७ देशांतील स्काऊट-गाईड विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे निवेदन क्षितिजा तेली आणि मनस्वी कदम यांनी केले.

मार्गदर्शक व अभिनंदन
एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे, सेक्रेटरी मीनाताई देवरे, प्राचार्य सुनील पाटील यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करता आले. एसकेडी इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा शिस्त आणि गुणवत्तेच्या बळावर आपला ठसा उमटवून दाखवला आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!