डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ दहिवडला कॅन्डल मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी

मनोज वैद्य/ दहिवड
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात १६ नोव्हेंबर रोजी एक ४ वर्षाच्या लहान बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करत मानुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून या घटनेचे तिव्र पडसाद देवळा तालुक्यातील दहिवड येथे उमटले आहेत. सम्पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आज दि.२० नोव्हेंबर रोजी दुपारपासून गाव बंद ठेवून सदर नराधम आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशी व्हावी यासाठी प्रशासनाल निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी दहिवड येथील सर्व ग्रामस्थ, युवक व महिलावर्ग होळी चौकात जमा झाले तेथून कॅन्डल मोर्चा काढून हनुमान मंदिर पाराच्या समोर पिडीत बालिकेस श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

तसेच यावेळी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन सदर प्रकरणातील आरोपीवर फास्टट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून अत्याचार करणाऱ्या सैतानाला फाशीची शिक्षा होऊन पिडीत परिवार व मृत बालिकेस लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी डॉ राजेंद्र ब्राह्मणकार, समाधान सोनवणे, गणेश देवरे, मधुकर पवार, ग्रामविकास समितीचे संजय दहिवडकर, श्रावण सोनवणे, निंबा तेली, दिगंबर सोनवणे, विलास देवरे, संदीप पवार,सुदाम भारती, राजु आलई, सागर सोनवणे, सुनील अहिरराव, रमन सोनवणे, मजीत तांबोळी, गौतम महिरे आदींसह युवक, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



